15/07/2018

बाप माझा शेतकरी !


पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।

कर्ज आणि दुष्काळ जसे पुजले त्याच्या पाचीला ।
विठू-माउली उभी आहे सदैव त्याच्या पाठीला ।।
शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही या हिंदुस्थानी मातीला ।
छत्रपती उभे ठाकले होते त्याच्या साथीला ।।

वारी करतो भक्ती भावाने असा हा वारकरी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।१।।

वरून राजा प्रसन्न तर हा खुश होणार ।
काबाड कष्टासाठी नेहमीच असे तयार ।।
पांढरं सोन पिकवतो हा सोनार ।
हमी भाव देवच जाणे कोण देणार ।।

फक्त खोटी आश्वासनं देतात सत्ताधारी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।२।।

सुट्टी नसते ना असतो ओव्हर टाइम ।
काम आणि कामच असते एनिटाईम ।।
कितीही करा प्रगती कितीही येवो तंत्रज्ञान ।
कारखान्यात धान्य बनत नाही असो याचे भान ।।
शेतकऱ्याची काळजी फक्त विरोधी पक्ष्याला ।
पण सत्ता मिळाल्यावर मात्र विसरतात बापाला ।।

बघत आलोय कष्ट त्याचे होतो जेव्हा शाळकरी ।
 जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।३।।

जय जवान जय किसान !

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी 
subscribe करायला विसरू नका आणि share करा तुमच्या मित्रांना .


(तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कळवा आणि जर काही चुका होत असतील तर नक्कीच कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल .)

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...