03/02/2024

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे,

घरात बाळ जन्माला येते

घरातल्यांचा आनंद द्विगुणित 

करणारं बालपण घरात येते


घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा

बालपण भारी देवा ...


बालपण जणू कुतूहलाचा भंडार असते

कुठलीही गोष्ट फुटेल, तुटेल किंवा बिघडेल,

ह्या भीती पलीकडची ती जिज्ञासा असते


बाळाचा सहवास वाटतो हवा हवा

बालपण भारी देवा ...


मुलं ही देवा घरची फुलं म्हणत 

जणू असतं ते देवपण

कारण देव सुद्धा अवतार घेऊन 

अनुभवतो हो बालपण


देवही बाळ होऊन करतो आई ची सेवा

बालपण भारी देवा ... 


बालपण जणू पहिल्या पावसात

भिजलेल्या सुवासित माती सारखं असतं,

आयुष्य रुपी उन्हात ते माणसाच्या

आठवणीत कायम सोबत असतं


आयुष्भर पुरेल असा आठवणींचा ठेवा

बालपण भारी देवा ...


खोडकर, नटखट आणि बेधुंद असतं बालपण

कावे, कारस्थानाच्या पलीकडचं असतं बालपण 

बिनधास्त चुका करायचं विद्यापीठ म्हणजे बालपण.

तर संसारिक जबाबदाऱ्या आणि बंधनांच्या पलीकडचं बालपण


भातुकलीच्या खेळामधून घ्यावा सांसारिक ठेवा

बालपण भारी देवा ...



- योगेश अमृते 

No comments:

Post a Comment

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...