06/09/2018

एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये.....


काय म्हणू त्याला खरंच सुचत नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये.....

कधी दगडातून मूर्ती घडवणारा तो वाटतो मूर्तिकार
तर कधी मातीतून मडकी घडवणारा तो वाटतो कुंभार
चित्रकला करताना तो भासतो कलाकार
तर विज्ञान शिकवणारा तो आहे किमयागार
खरंच विद्यार्थ्यांच्या जीवनरूपी खेळाचा तोच आहे कर्णधार

त्याची तुलना करेल एवढा मोठा मी नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

शिक्षक,गुरु,टीचर तर कधी म्हणतात त्यांना मास्तर
विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारा तो भास्कर
अर्जुनाला घडविणारे होते द्रोणाचार्य
चंद्रगुप्ताचा सम्राट करणारे हेच ते आचार्य

त्याच्या कृपेने आता अपयशाचीही भीती नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

कधी तो भासतो जसा रेल्वे रूळ
विद्यार्थी रुपी डबा त्याच्या धेयरुपी स्थानकावर पोहचवणारा रेल्वे रूळ
मातापिता आणि गुरुवर्य
उद्याचा समाज घडवीनारे हेच चंद्रसूर्य

गुरु असून त्यालाही गुरु शिवाय पूर्णत्व नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

या कवितेला मी शीर्षक देऊ शकलो नाहीये
कारण एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये....

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

(माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून कळवा . काही सुधारणा किंवा सल्ला असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.)

6 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...