18/10/2018

महाराष्ट्राची माती !!

जन्मलो या महाराष्ट्रात खरा भाग्यवान मी ।
नतमस्तक होतो छत्रपती चरणी सदैव राहील भक्त मी ।।

लाभल्या संतांच्या आम्हास पाऊलखुणा 
मोडेल पण वाकणार नाही हाच मराठी बाणा
इतिहासातील मिळतात इथे पावलो-पावली खाणाखुणा
होऊन गेले असे व्यक्ती ज्यांची याद येते पुन्हा पुन्हा

येथे अनेक धर्म आणि अनेक आहेत जाती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

भारतभूमिला चलतचित्र देणारी हीच कलावती
समर्थांचे श्लोक घुमले येथेच अवती-भवती
इथेच शिर्डी आणि इथेच आहे साई
मराठीचं संगोपन करणारी हीच ती आई

अंधाराचा नाश करतात दिव्यात जळत्या वाती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

तुकोबांचे अभंग, ज्ञानियांची ज्ञानेश्वरी
जन्मताच मिळालेली जशी ज्ञान रुपी शिदोरी
भक्ती भावाने वारी करतो विठुरायाचा वारकरी
छत्रपतींसाठी जीवावर पाणी सोडतो धारकरी

शिव-शंभूच्या पराक्रमाची साक्षीदार हि माती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

जय महाराष्ट्र !
जय शिव-शंभो !!



माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

(माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून कळवा . काही सुधारणा किंवा सल्ला असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.)

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...