ती म्हणजे जसे उमळलेलं फुल ।
नका लादू तिच्यावर चूल आणि मूल ।।
जन्म तिचा होताच ती जबाबदारी वाटते ।
मात्र तिच्या जबाबदारपणाकडे लक्ष्य कुणाचे नसते ।।
ताराबाईंच्या रूपात हीच ती रणरागिणी ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी ।। १ ।।
कधी ती मनू ची मणिकर्णिका होते ।
आणि पाठीला दामोदरांना घेऊन लढते ।।
तर कधी जिजाऊ ची राजमाता होते ।
आणि छत्रपतींना घडवून जाते ।।
तलवारीपेक्षा धारदार असते ती लेखणी ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी ।।२।।
वडिलांचा आधार असते मुलगी ।
बहिन तर कधी आई असते मुलगी ।।
घरची लक्ष्मी म्हणजे मुलगी ।
तर कधी सून म्हणून येते मुलगी ।।
मुलगा जर वंशाचा दिवा असेल ।
तर आयुष्यभर झिजणारी समई म्हणजे मुलगी ।।
एक नाही तर दोन घरांची करते ती बांधणी ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी ।।३।।
• Save girl child !