16/03/2019

दृष्टीकोन (Attitude)


यश रुपी गरुडाचे पंख म्हणजे दृष्टीकोन
भविष्य बदलवणारा परिवर्तक म्हणजे दृष्टीकोन
अडचणीत संधी शोधणारा गोताखोर म्हणजे दृष्टीकोन
तर दर दिवशी नावीन्य शोधणारा शोधक म्हणजे दृष्टीकोन

धावणाऱ्या रेल्वेचा चंद्रही पाठलाग करतो  ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो    ।।

कधी तो ढगांच्या आकृत्यात चित्र शोधतो
तर कधी अंथरुणात पडलेल्या पीडितांची आस होतो
सकारात्मकता आणि नकारात्मकता सुध्दा ठरवतो
तर कधी उडणाऱ्या पतंगात आपली धडपड शोधतो

समोरच्या खिडकीतही चंद्राचा तुकडा दिसतो ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो    ।।

हाच दृष्टीकोन कधी कवितेच्या प्रेमात पडतो
आणि शब्दांचे अलंकारिक रूप शोधतो
माझ्या मनातलं गुज मलाच सांगतो
आणि कविता बनून तुमच्या समोर येतो
दुनिया रुपी सिनेमा सुद्धा बदलतो
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो 

सकाळी दिसणारा सूर्य दुपारी नको-नको वाटतो    ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाची खिडकीच बदलून पाहतो    ।।



माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe by e-mail आणि follow करायला विसरू नका.

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...