11/07/2019

विठू माऊली


तुझ्या भेटीची आस या पावली ।
माय-बाप माझी विठू माऊली  ।।

पुंडलिका साठी उभा विटेवरी
हात दोन्ही आहेत कटेवरी
भक्तांचा पाठीराखा सावळा हरी
दर्शनाचा अभिलाषी विठूचा वारकरी

नामघोष याचा पावलो-पावली  ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।१।।

चंद्रभागे तीरी याची नगरी
नाथ हा जिचा ती पंढरी
भक्तांच्या जीवनाला तो उद्धारी
तुळशी वृंदावन वारकऱ्यांच्या दारी

वारकऱ्यांच्या डोई प्रेमाची सावली  ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।२।।

चंद्रभागेला भेटायला येते इंद्रायणी
विठू माऊलीच फक्त ध्यानी आणि मणी
डोंबा घरी हरी भरतो पाणी
माउली माउली हर एकाच्या वाणी

वसे हृदयी न आवडे त्यास राऊळी ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।३।।


बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...