26/06/2020

एक होती शाळा

एक होती शाळा, आमच्या वेळची
सुंदर होतं सगळं, गोष्ट आहे कालची
गुरुजींचा धाक होता, प्रेमही तेवढं होतं
Bag नव्हती हो, आणि पुस्तकांचं ओझही नव्हतं

लिहीनं वाचणं शिकवलं, जगणंही शिकवलं
आमच्या मराठी शाळेनं, जीवनाच्या परीक्षेत पास होणं शिकवलं
परिपाठ व्हायचा, प्रार्थनाही व्हायची
गणवेश साधा होता, डोकीही शांत राहायची
अभ्यासाचा आनंद होता, भीती कधी नव्हती
स्पर्धाही होती तेव्हा, पण मागे राहिलो तरी खंत नव्हती

शाळेचं स्कूल झालं आणि सगळं काही बदललं
इंग्रजी च्या नादात बालपण मात्र हेरावलं
मैदानी खेळ आता मोबाईल मध्ये उतरले
मामाचे पत्र मात्र मराठी शाळेतच हरवलं

पाठांतर करून मुलं इंग्रजी तर शिकली
एक माणूस बनवायला शाळा मात्र चुकली
स्पर्धेमुळे आता अभ्यास तर वाढला 
अभ्यासातला आनंद मात्र कुठे तरी हरवला

मराठी चे वारसदार आपण, पण तीच तोंडची पळाली
इंग्रजी शाळांनी मराठी थोडीच शिकवली
आपल्याला मराठी शाळेनं खुप मोठं बनवलं 
इंग्रजी शाळेची फिस भरू या लायक तरी बनवलं.

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...