03/11/2019

जगाचा पोशिंदा !

कहर मांडलाय पावसानं
अजून किती हिम्मत ठेवावी माणसानं
कोंब वर काढलेत कणीसानं
कापूस सुद्धा उगलाय या पावसानं

बस कर आता वरून देवा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।१।।

येरे येरे पावसा आता कसं म्हणावं
अश्या परिस्तितीत कोणी कसं हसावं
अतिथी देव भव: बोलावणारे आम्ही,
तुला तरी जा कसं म्हणावं

तुच व्यथा आता समज देवा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।२।।

आश्वासनांचा पाऊस अगोदरच खूप झालाय
त्यात तू अजून तुझा कहर मांडलाय
नेते मंडळीसाठी हा तर एक खेळच झालाय
आमच्या भावनांचा मात्र त्यांनी बाजारच मांडलाय

तू तरी पक्का कर आता दावा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।३।।

तू फक्त मला साथ दे
संकटांना मी घाबरत नाही
आणि तुझी साथ असेल तर,
मला गरज कुणाची नाही
आत्महत्या मी करणार नाही
जगाचा पोशिंदा आहे एवढ्या लवकर हात टेकणार नाही

पावसाळ्यात मी तुझी वाट पाहिल वादा करतो देवा ।
पण तू त्या आधी येणार नाही असा कर तू दावा ।।४।।

6 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...