29/03/2020

गांभीर्य

कधी सावध होणार आम्ही
कधी स्वतःला सावरणार आम्ही
शत्रू बाहेर वाट बघतोय,
कधी दबा धरून बसायला शिकणार आम्ही.

बाहेर जाताना आम्ही, मास्क सुध्दा नाही हो नेत
कुटुंबाचा विचार सुध्दा, नाही हो आम्हाला येत
संकट आलं देशावर जागं आता झालं पाहिजे
परिस्थितीचा सामना करायला सावध आता झालं पाहिजे

देशभक्ती दाखवायची हीच वेळ आहे
शस्त्राची गरज नाही वेळच संहारक आहे
डॉक्टर-पोलिस सेवेत आपल्या आहेत
आपण मात्र अजूनही बेसावध आहोत

वेळ अजूनही गेलेली नाहीये
मेल्या पेक्षा घरात राहणं वाईट नाहीये
आपल्या घरात तो आल्यानंतर आम्ही सुधारणार का?
आपल्या निष्काळजीपणा साठी जीवावर उदार होणार का?

जय हिंद!

काळजी घ्या. घराच्या बाहेर पडू नका. प्रशासन दिवसरात्र आपल्यासाठी मेहनत करतय थोडं सहकार्य करा.
#Covid-19

09/03/2020

घर सोडून राहताना

तो आईच्या हातचा स्वयंपाक
बाबांचा तुमच्यावरचा प्रेमरुपी धाक
आईने तुम्हाला शाळेत बसवलेला बाक
आंब्याच्या झाडावरून पडलेली ती शाक

खुप सोसावं लागतं घर सोडून जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।१।।

दादा सोबतचं भांडण
गावातलं झेंडा वंदन
सात वर्षात न पाहिलेला दसरा
होळीला घातलेला जुना सदरा

मोठा भाऊ सुद्धा रडतो हो तुम्ही जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।२।।

ताईने रक्षाबंधनात बांधलेली ती राखी
आंबे जांभळं करवंद होतात अनोळखी
गावातली जत्रा आणि देवीची यात्रा
त्या जुन्या गोड आठवणींच ह्या दुःखाची मात्रा

दरवेळी सासरी गेल्या सारखा वाटतं हो जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।३।।

येणारा प्रत्येक सण घरची आठवण देतो
इथे राहणारे कुटुंब बघून आम्ही खुश होतो
शेतात खाल्लेला हुरडाही खुप आठवतो
गणपतीसाठी केलेली सजावट आम्ही आठवणीत साठवतो

कधी कधी आसवांचा बांध फुटतोच हो ईथं राहताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।४।।


Dedicated to all the boys and girls who lives away from their home.  Proud of you guys 💛



बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...