03/09/2020

आजोबा !

 वाटतात ते दिवस जणू

मामाचं हरवलेलं पत्र

आयुष्यातला पहिलाच

मिळालेला निस्वार्थी मित्र


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

जीवनरुपी थंडीत मिळालेली मायेची ऊब ।।


आजोबा कमी, मित्रच जास्त वाटायचे

दुःख ठेवयचे मागे, सुख तेवढं वाटायचे

म्हणायचे सगळे आजोबांचा लाडका तू,

मनातून तेव्हा, जग जिंकल्या सारखं वाटायचे


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

खूप काही सांगताना मार्गदर्शक वाटायचे हुबेहूब ।।


आजोबा सांगायचे ती आजही आठवते,

त्या शुर राजाची गोष्ट

ज्या साठी आम्ही विनवण्या करायचो

आजोबा, गोष्ट सांगा ना गोष्ट


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

विठू-माऊली सारखं त्यांचं ते स्वरूप ।।


मी चालायला-बोलायला लागल्या पासून

आजोबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत चा तो प्रवास

अजूनही अधुरा-अधूरा वाटतो 

तो अधुराच राहिलेला प्रवास


आजही आठवते माझी शेवटची मारलेली आकांत हाक ।

देवाला भेटायला जाताना त्यांनी नं ऐकलेली माझी अधुरी हाक ।।



आजोबा येवढ्या वर्षानंतरही तुमची कमी जाणवते. गहिवरून येतं मन तुमच्या आठवणीत. I miss you Grandpa.💛


                                                                 तुमचा लाडका

                                                                      आदी !

11 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...