मुलगा
झाला आनंद झाला
वंशाचा दिवा झाला
नवस केला होता देवाला
तो आता पूर्ण झाला
घरापासून दूर सासरी गेल्या
सारखं राहणं
मन लागेल न लागेल तरी
अभ्यास मात्र करणं
हे सगळे कारणं तुला
देता येणार नाही
कारण नापास होणे हा पर्यायच
तुझ्याकडे नाही
हळू हळू मोठा होत
शिक्षण पूर्ण होत आलं
नोकरी मात्र लागली नाही
अरे हे असं कसं
झालं
शेवटी सुदैवाने नोकरी लागली
प्रयत्नांची पराकाष्ठा कामी आता लागली
तुला कोण मुलगी देईल
? ची थट्टा बंद होऊन
किती कमवतो ? ची चेष्टा मागे
लागली
अपयश येवो नाहीतर प्रेमभंग
होवो
तुला मात्र रडता येणार नाही
कारण लहानपणापासून ऐकलंय
म्हणे मर्दला ला दर्द होत
नाही
ह्या सगळ्या नादात आम्हाला
कधी व्यक्तच होता येत नाही
इच्छा असून सुद्धा वडिलांना
मिठी
मारायची हिम्मत आमची कधीच होत
नाही
घर बांधण्यासाठी आम्ही
घर सोडून जातो
राजकुमारासारखा राहणारा तो
बाहेर तडजोड करून राहतो
जबाबदार्यांची ओझी
आता जाणवायला लागतात
सगळ्यांच्या अपेक्षांच्या मध्ये
तुझ्या इच्छा मात्र मार्गी लागतात
लग्न झाल्यानंतर ती आयुष्यात येते
आणि जबाबदार्यांमध्ये नकळतपणे वाढ होते
कालपर्यंत लहान वाटणाऱ्या मुलाचा
आता घरचा कर्ता पुरुष
होते
जबाबदारी रुपी वंशाचा दिवा
असतो मुलगा
आई वडिलांचा आधार असतो मुलगा
अपेक्षापूर्ती कल्पवृक्ष म्हणजे मुलगा
तर सगळे मुलं सारखेच
असतात चा सोशिक म्हणजे
मुलगा
Dedicated to all the boys !
07/10/2021
मुलगा
Subscribe to:
Posts (Atom)
बालपण भारी देवा ...
कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...
-
काय म्हणू त्याला खरंच सुचत नाहीये एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये..... कधी दगडातून मूर्ती घडवणारा तो वाटतो मूर्तिकार तर कधी मात...
-
दोन मनांना विधीवत एक करणारा संस्कार. हिंदू धर्मातील पवित्र असा विवाह संस्कार सर्वतोपरी केलेला एकमेकांचा स्वीकार एकमेकांवर सांगीतला जाणारा...
-
कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...