07/10/2021

मुलगा

मुलगा झाला आनंद झाला
वंशाचा दिवा झाला
नवस केला होता देवाला
तो आता पूर्ण झाला

घरापासून दूर सासरी गेल्या सारखं राहणं
मन लागेल लागेल तरी अभ्यास मात्र करणं
हे सगळे कारणं तुला देता येणार नाही
कारण नापास होणे हा पर्यायच तुझ्याकडे नाही

हळू हळू मोठा होत
शिक्षण पूर्ण होत आलं
नोकरी मात्र लागली नाही
अरे हे असं कसं झालं

शेवटी सुदैवाने नोकरी लागली
प्रयत्नांची पराकाष्ठा कामी आता लागली
तुला कोण मुलगी देईल ? ची थट्टा बंद होऊन
किती कमवतो ? ची चेष्टा मागे लागली

अपयश येवो नाहीतर प्रेमभंग होवो
तुला मात्र रडता येणार नाही
कारण लहानपणापासून ऐकलंय
म्हणे मर्दला ला दर्द होत नाही

ह्या सगळ्या नादात आम्हाला
कधी व्यक्तच होता येत नाही
इच्छा असून सुद्धा वडिलांना मिठी
मारायची हिम्मत आमची कधीच होत नाही

घर बांधण्यासाठी आम्ही
घर सोडून जातो
राजकुमारासारखा राहणारा तो
बाहेर तडजोड करून राहतो

जबाबदार्यांची ओझी
आता जाणवायला लागतात
सगळ्यांच्या अपेक्षांच्या मध्ये
तुझ्या इच्छा मात्र मार्गी लागतात

लग्न झाल्यानंतर ती आयुष्यात येते
आणि जबाबदार्यांमध्ये नकळतपणे वाढ होते
कालपर्यंत लहान वाटणाऱ्या मुलाचा
आता घरचा कर्ता पुरुष होते

जबाबदारी रुपी वंशाचा दिवा असतो मुलगा
आई वडिलांचा आधार असतो मुलगा
अपेक्षापूर्ती कल्पवृक्ष म्हणजे मुलगा
तर सगळे मुलं सारखेच असतात चा सोशिक म्हणजे मुलगा


Dedicated to all the boys !


2 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...