28/02/2023

मैत्री

 काय असते हो मैत्री ??


मैत्री म्हणजे जणू जीवन रुपी

उन्हात मिळालेली सावली

जीवनातल्या प्रत्येक संकटात 

मैत्रीच आधी धावली


दररोज मिळालेला मानसिक आधार असते मैत्री

खचल्यानंतर मिळालेली खंबीर साथ म्हणजे मैत्री


चुकल्या नंतर हक्कानं कान धरते

पडल्यानंतर मात्र प्रेमाने सावरते

चूक अचूक नेमकं ओळखून

मित्राचा जणू सल्लागार बनते


न बोलता मन ओळखणारी मनकवडी असते मैत्री

सुदामाचे पोहे ही आवडीने खाणारी निरहंकार असते मैत्री


मैत्री आरश्या सारखी असते

निर्मळ निस्वार्थ ती पारदर्शक असते

दुःख रुपी कोरोनावर जणू

ती आनंदाचा डोस असते


वेगवेगळ्या कुरापतीत केलेली साथ म्हणजे मैत्री

तर कमीने पणाची केलेली हद्द म्हणजे मैत्री


मित्र-मैत्रीण जणू मैत्री रूपी 

नावेचे नावाडी असतात

जीवन रूपी समुद्रात

ते नाव वलवतच असतात


विचार आणि गुण-अवगुनांचा झालेला संगम म्हणजे मैत्री

जात पात आणि धर्माच्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री


मरेपर्यंत मिळालेली साथ मैत्री

एकटेपणात मारलेली हाक मैत्री

एकमेकांची काढलेली लाज मैत्री

तर कितीही व्यस्त असलो तरी 

बोलायचा घातलेला घाट मैत्री


जीवन रुपी पक्वांनाला चव आणणारं मीठ म्हणजे मैत्री

तर निसंकोच मन मोकळं करायचं ठिकाण म्हणजे मैत्री


No comments:

Post a Comment

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...