08/06/2018

प्रत्येकाच्या घरी असलेलं दैवत म्हणजे बाबा !

बाबा

होय ज्यांचं नाव आई नंतर जोडलं जातं तेच बाबा।
ज्याच्या विषयी जास्त बोलले-लिहिले जात नाही तेच हे बाबा ।।

ज्यांच्या आगोदर तुमचे कोणी हिरो नसावे असे हे बाबा ।
आयुष्यभर निस्वार्थ तुमच्यासाठी झटणारे हेच ते बाबा ।।

काटकसर आणि त्यागाचे महामेरू फक्त बाबा।
निस्वार्थपणे फक्त तुमच्या भल्याचा विचार करणारे फक्त बाबा ।।

मुलींसाठी प्रेमाचा झरा असते आई पण मुलीवर संकट आल्यावर रुद्र रूप घेणारे फक्त बाबा।
पप्पा,बाबा,वडील ,आणि बाप अशा नावांनी संबोधलं जाणारे बाबा ।।

आई दररोज मुलाची आठवण काढते त्याला फोन करते पण आठवण येऊनही कधी न सांगणारे बाबा।
आई दररोज आठवण काढते पण अचानक नियोजन नसताना भेटायला येतात ते बाबा ।।

साने गुरुजींनाही न दिसलेले बाबा ।
वरून थोडेसे तापट पण आतून मायेचा पाझर असलेले फक्त बाबा।।

वेळेचं महत्व तुम्हाला खूप जण सांगतील  पण
वडिलांचं महत्व तुमच्या त्या मित्राला विचारा ज्याला लहानपणीच सोडून गेलेत त्याचे बाबा।
ते गेल्यानंतर मोठा भाऊ ज्यांची कमी पूर्ण करण्याचा प्रयन्त करतो तेच हे बाबा ।।

माझ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मा आगोदरच
स्वराज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक हेच ते बाबा।
असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे नाही जाता आलं म्हणून देवाने माता निर्माण केली
पण त्या मातेलाही मातृत्व ज्यांच्या मूळे लाभते तेच हे बाबा।।

ज्यांच्या मूळे मी हे सुंदर जग बघू शकलो ते माझे प्रिय बाबा।
ज्यांचे उपकार मरेपर्यंतही फिटणार नाहीत असं माझे बाबा ।।

ज्याचे नाव अभिमानाने सांगावे अशा बाबांना हि माझी छोटीसी भेट ।


6 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...