08/06/2018

फौजी

फौजी,आर्मी,सैनिक हाच तो भारतीय जवान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान.

आपण लढतो जातीसाठी,
तो लढतो मातीसाठी.
आपण लढतो धर्मासाठी,
तो लढतो देशधर्मासाठी.

धर्म,जात,गोत्र,वंश त्याचे आहेत हिंदुस्तान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।१।।

त्याच्या कर्तव्याची आहे मोठी ख्याती,
लढतो बेभान होऊनी फक्त देशासाठी.
दुर्दैवाने आपले अनेक धर्म ,अनेक आहेत जाती,
त्याच्यासाठी देशच धर्म आणि देशच आहेत जाती.

तिन्ही ऋतू त्याच्यासाठी आहेत एक समान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।२।।

राहून-राहून सतावतो प्रश्न मला हा एक,
त्यांनी आपल्यासाठी मरावं,आहोत का आपण त्या लायक?
आठवण काढावी त्यांची १५ ऑगस्ट नंतरही,
देशभक्ती जागीच असावी १५ ऑगस्ट नंतरही.

लपेटून घेतो तिरंग्यात खरंच आहे भाग्यवान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।३।।

काळजी घेते बाळाची जशी त्याची माता,
काळजी घेतो हा जिची ती आहे भारतमाता.
आईची काळजी करणारा हाच तो श्रावण बाळ,
नमन करत असेल त्याला आल्यानंतर काळ.

देशाचा आत्मा आहेत भारतीय जवान.
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।४।।

जय हिंद !!

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी 
subscribe करायला विसरू नका आणि share करा तुमच्या मित्रांना .

(तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कळवा आणि जर काही चुका होत असतील तर नक्कीच कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल .)

3 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...