12/04/2019

निवडणुकीचे वारे

प्रलोभनांचा पाऊस आता करील वर्षाव
नोटांमध्ये होईल आता इमानाचा भाव
भले-भले त्यांच्या बळी पडतील राव
स्वाभिमानाचा सुद्धा हे करतील लिलाव

भर उन्हाळयात सुरू झाले हे बिनमौसमी वारे   ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।१।।

खुर्चीचा खेळ आता मात्र रंगेल
उमेदवारी साठी ते पक्षही बदलेल
आश्वासनांचा आता इतिहास घडेल
मतदारच ठरवेल आता पुढे काय घडेल

मतदारांसाठी खरच आहेत, ही संधी रुपी दारे     ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।२।।

मंदिर-मशीद आता पटावर लागतील
एवढे दिवस झोपलेले आता मात्र जागतील
जातीवादाचा साप आता हे सोडतील
दुर्दैवाने बरेच त्याला बळी सुद्धा पडतील

विचारपूर्वक करा मतदान मग बदलेल उद्या सारे    ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।३।।

Be the proud voter of India !

3 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...