14/05/2019

शंभो छत्रपती

सिंहाच्या पोटी छावा जन्मला
किल्ले पुरंदराचा कैलास झाला
सूर्यनारायण सुद्धा फिका पडला
जेव्हा शंभो सूर्याचा जन्म झाला

पुरंदर रुपी कैलासाचे अधिपती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।१।।

नियतीने त्यांना बालपणीच पोरक केले
पित्यासाठी अल्पवयात राजकारण केले
आग्ऱ्यात जाऊन औरंग्याला नडले
आणि चतुराईने तुरी देऊन निसटले

रयतेची काळजी करणारा प्रजापती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती  ।।२।।

कारस्तानाचे विष गळी उतरवले
माफी रुपी चंद्राला माथी मिरवले
काव्यरचना करून मन जिंकले
मित्रत्वाचे जिवंत उदाहरण दिले

धर्मवीर धर्मशील शौर्यपती।     
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।३।।

नऊ वर्ष औरंगजेबाला रडवले
आम्हास कसं मरावं हे दाखवले
इथे लाखो शंभो परत जन्मले
औरंग्याची समाधी बांधूनच थांबले 

मृत्युंजय अजिंक्य भूतपती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।४।।

6 comments:

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...