30/11/2020

विवाह संस्कार

 दोन मनांना विधीवत एक करणारा संस्कार. 

हिंदू धर्मातील पवित्र असा विवाह संस्कार 

सर्वतोपरी केलेला एकमेकांचा स्वीकार

एकमेकांवर सांगीतला जाणारा तो अधिकार


रखुमाई ची सावली जणू विठू माऊली

आयुष्यभर साथ देणारी जणू ती सावली 


ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमातला तो प्रवास 

जीवनातला सुरू होणारा तो अभूतपूर्व सहवास

एकमेकांवरचा वाढत जाणारा तो दृढ विश्वास

एकमेकांसाठीच घेतलेला तो श्वास आणि निःश्वास 


तिच्यासाठी पती परमेश्वर वसे जणू राउळी

आयुष्यभर साथ देणारी जणू ती सावली 


जीवनरुपी अंधारात प्रकाश 

देणारी जणू दिव्यातली वात

जीवनातल्या प्रत्येक वळणावर 

धीर देणारा तो हक्काचा हात


जीवनात सोबत राहील ती पावलो पावली 

आयुष्यभर साथ देणारी जणू ती सावली 


माझ्या लाडक्या मित्राला वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


03/09/2020

आजोबा !

 वाटतात ते दिवस जणू

मामाचं हरवलेलं पत्र

आयुष्यातला पहिलाच

मिळालेला निस्वार्थी मित्र


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

जीवनरुपी थंडीत मिळालेली मायेची ऊब ।।


आजोबा कमी, मित्रच जास्त वाटायचे

दुःख ठेवयचे मागे, सुख तेवढं वाटायचे

म्हणायचे सगळे आजोबांचा लाडका तू,

मनातून तेव्हा, जग जिंकल्या सारखं वाटायचे


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

खूप काही सांगताना मार्गदर्शक वाटायचे हुबेहूब ।।


आजोबा सांगायचे ती आजही आठवते,

त्या शुर राजाची गोष्ट

ज्या साठी आम्ही विनवण्या करायचो

आजोबा, गोष्ट सांगा ना गोष्ट


आजही आठवते ती अंथरुणातली ऊब ।

विठू-माऊली सारखं त्यांचं ते स्वरूप ।।


मी चालायला-बोलायला लागल्या पासून

आजोबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत चा तो प्रवास

अजूनही अधुरा-अधूरा वाटतो 

तो अधुराच राहिलेला प्रवास


आजही आठवते माझी शेवटची मारलेली आकांत हाक ।

देवाला भेटायला जाताना त्यांनी नं ऐकलेली माझी अधुरी हाक ।।



आजोबा येवढ्या वर्षानंतरही तुमची कमी जाणवते. गहिवरून येतं मन तुमच्या आठवणीत. I miss you Grandpa.💛


                                                                 तुमचा लाडका

                                                                      आदी !

26/06/2020

एक होती शाळा

एक होती शाळा, आमच्या वेळची
सुंदर होतं सगळं, गोष्ट आहे कालची
गुरुजींचा धाक होता, प्रेमही तेवढं होतं
Bag नव्हती हो, आणि पुस्तकांचं ओझही नव्हतं

लिहीनं वाचणं शिकवलं, जगणंही शिकवलं
आमच्या मराठी शाळेनं, जीवनाच्या परीक्षेत पास होणं शिकवलं
परिपाठ व्हायचा, प्रार्थनाही व्हायची
गणवेश साधा होता, डोकीही शांत राहायची
अभ्यासाचा आनंद होता, भीती कधी नव्हती
स्पर्धाही होती तेव्हा, पण मागे राहिलो तरी खंत नव्हती

शाळेचं स्कूल झालं आणि सगळं काही बदललं
इंग्रजी च्या नादात बालपण मात्र हेरावलं
मैदानी खेळ आता मोबाईल मध्ये उतरले
मामाचे पत्र मात्र मराठी शाळेतच हरवलं

पाठांतर करून मुलं इंग्रजी तर शिकली
एक माणूस बनवायला शाळा मात्र चुकली
स्पर्धेमुळे आता अभ्यास तर वाढला 
अभ्यासातला आनंद मात्र कुठे तरी हरवला

मराठी चे वारसदार आपण, पण तीच तोंडची पळाली
इंग्रजी शाळांनी मराठी थोडीच शिकवली
आपल्याला मराठी शाळेनं खुप मोठं बनवलं 
इंग्रजी शाळेची फिस भरू या लायक तरी बनवलं.

29/03/2020

गांभीर्य

कधी सावध होणार आम्ही
कधी स्वतःला सावरणार आम्ही
शत्रू बाहेर वाट बघतोय,
कधी दबा धरून बसायला शिकणार आम्ही.

बाहेर जाताना आम्ही, मास्क सुध्दा नाही हो नेत
कुटुंबाचा विचार सुध्दा, नाही हो आम्हाला येत
संकट आलं देशावर जागं आता झालं पाहिजे
परिस्थितीचा सामना करायला सावध आता झालं पाहिजे

देशभक्ती दाखवायची हीच वेळ आहे
शस्त्राची गरज नाही वेळच संहारक आहे
डॉक्टर-पोलिस सेवेत आपल्या आहेत
आपण मात्र अजूनही बेसावध आहोत

वेळ अजूनही गेलेली नाहीये
मेल्या पेक्षा घरात राहणं वाईट नाहीये
आपल्या घरात तो आल्यानंतर आम्ही सुधारणार का?
आपल्या निष्काळजीपणा साठी जीवावर उदार होणार का?

जय हिंद!

काळजी घ्या. घराच्या बाहेर पडू नका. प्रशासन दिवसरात्र आपल्यासाठी मेहनत करतय थोडं सहकार्य करा.
#Covid-19

09/03/2020

घर सोडून राहताना

तो आईच्या हातचा स्वयंपाक
बाबांचा तुमच्यावरचा प्रेमरुपी धाक
आईने तुम्हाला शाळेत बसवलेला बाक
आंब्याच्या झाडावरून पडलेली ती शाक

खुप सोसावं लागतं घर सोडून जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।१।।

दादा सोबतचं भांडण
गावातलं झेंडा वंदन
सात वर्षात न पाहिलेला दसरा
होळीला घातलेला जुना सदरा

मोठा भाऊ सुद्धा रडतो हो तुम्ही जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।२।।

ताईने रक्षाबंधनात बांधलेली ती राखी
आंबे जांभळं करवंद होतात अनोळखी
गावातली जत्रा आणि देवीची यात्रा
त्या जुन्या गोड आठवणींच ह्या दुःखाची मात्रा

दरवेळी सासरी गेल्या सारखा वाटतं हो जाताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।३।।

येणारा प्रत्येक सण घरची आठवण देतो
इथे राहणारे कुटुंब बघून आम्ही खुश होतो
शेतात खाल्लेला हुरडाही खुप आठवतो
गणपतीसाठी केलेली सजावट आम्ही आठवणीत साठवतो

कधी कधी आसवांचा बांध फुटतोच हो ईथं राहताना
पण सगळं विसराव लागतं घर सोडून राहताना ।।४।।


Dedicated to all the boys and girls who lives away from their home.  Proud of you guys 💛



बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...