16/12/2018

वेळ

शब्द छोटा पण जबाबदारी मोठी
दिला तर पाळावा नाहीतर जबान ठरते खोटी
रावाचा रंक आणि रंकाचा राव करते
चांगल्या चांगल्यांची वेळेनुसार जिरते ।।१।।

सर्वात शक्तिशाली असते ती वेळ
कारण माणसे बदलतात जशी बदलते वेळ
कुठल्याही मानसिक जखमेच मलम म्हणजे वेळ
भूत भविष्य आणि वर्तमान म्हणजे वेळ  ।।२।।

वाईट परिस्तितीत सय्यमाने टिकल्यानंतर
यशाची साक्षीदार असते वेळ
सकाळी ४ ₹ला विकला जाणारा पेपर संध्याकाळी
 ४₹ किलो नी विकतो जेव्हा साथ सोडते वेळ ।।३।।

कुठल्याही कामाला हीचं असतं बंधन
हिच्या येण्या-जाण्याला मात्र नसतं बंधन
चांगली असो वा वाईट वेळ हि निघून जाते
मग ती आपली असो वा दुसऱ्याची ती बदलत राहते ।।४।।

तुमचा अमूल्य वेळ काढून माझी कविता वाचल्याबद्दल
मनापासून धन्यवाद !


•  माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

18/10/2018

महाराष्ट्राची माती !!

जन्मलो या महाराष्ट्रात खरा भाग्यवान मी ।
नतमस्तक होतो छत्रपती चरणी सदैव राहील भक्त मी ।।

लाभल्या संतांच्या आम्हास पाऊलखुणा 
मोडेल पण वाकणार नाही हाच मराठी बाणा
इतिहासातील मिळतात इथे पावलो-पावली खाणाखुणा
होऊन गेले असे व्यक्ती ज्यांची याद येते पुन्हा पुन्हा

येथे अनेक धर्म आणि अनेक आहेत जाती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

भारतभूमिला चलतचित्र देणारी हीच कलावती
समर्थांचे श्लोक घुमले येथेच अवती-भवती
इथेच शिर्डी आणि इथेच आहे साई
मराठीचं संगोपन करणारी हीच ती आई

अंधाराचा नाश करतात दिव्यात जळत्या वाती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

तुकोबांचे अभंग, ज्ञानियांची ज्ञानेश्वरी
जन्मताच मिळालेली जशी ज्ञान रुपी शिदोरी
भक्ती भावाने वारी करतो विठुरायाचा वारकरी
छत्रपतींसाठी जीवावर पाणी सोडतो धारकरी

शिव-शंभूच्या पराक्रमाची साक्षीदार हि माती ।
कपाळी लावून धन्य होतो या महाराष्ट्राची माती ।।

जय महाराष्ट्र !
जय शिव-शंभो !!



माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

(माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून कळवा . काही सुधारणा किंवा सल्ला असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.)

06/09/2018

एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये.....


काय म्हणू त्याला खरंच सुचत नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये.....

कधी दगडातून मूर्ती घडवणारा तो वाटतो मूर्तिकार
तर कधी मातीतून मडकी घडवणारा तो वाटतो कुंभार
चित्रकला करताना तो भासतो कलाकार
तर विज्ञान शिकवणारा तो आहे किमयागार
खरंच विद्यार्थ्यांच्या जीवनरूपी खेळाचा तोच आहे कर्णधार

त्याची तुलना करेल एवढा मोठा मी नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

शिक्षक,गुरु,टीचर तर कधी म्हणतात त्यांना मास्तर
विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारा तो भास्कर
अर्जुनाला घडविणारे होते द्रोणाचार्य
चंद्रगुप्ताचा सम्राट करणारे हेच ते आचार्य

त्याच्या कृपेने आता अपयशाचीही भीती नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

कधी तो भासतो जसा रेल्वे रूळ
विद्यार्थी रुपी डबा त्याच्या धेयरुपी स्थानकावर पोहचवणारा रेल्वे रूळ
मातापिता आणि गुरुवर्य
उद्याचा समाज घडवीनारे हेच चंद्रसूर्य

गुरु असून त्यालाही गुरु शिवाय पूर्णत्व नाहीये
एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये......

या कवितेला मी शीर्षक देऊ शकलो नाहीये
कारण एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाहीये....

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

(माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून कळवा . काही सुधारणा किंवा सल्ला असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.)

02/09/2018

माझी प्रियसी 💛

काव्य, पद्य,पोएम आणि कविता
शब्दरूपी सौंदर्याची ती मेनका
जिच्याशी मनसोक्त येतं बोलता
तीच माझी लाडकी कविता

सुरुवात होते विचारांनी
नंतर होते मांडणी
अक्षरांचे शब्द शब्दांच्या ओळी
विचारांची बांधता येते मोळी

अर्थपूर्ण शब्द स्पर्शून तर,
कधी चिरून जातात हृदयाला
कल्पना शक्तीहि
लागते हो पणाला

कधी कधी भासते जशी प्रियसी
नखरे आणि हट्ट करते सारखी
सर्वांसमोर यायला लाजते
एकांत आणि शांतता फक्त मागते

प्रत्येकाला नाही भासत ती सौंदर्यवती
याचा खरंच हो वाटतो हेवा
कारण तिला बघायला
दृष्टी नाही दृष्टीकोन हवा

आवडतं करायला तिच्याशी हितगुज
तिच्यामुळेच कळतं माझ्याच मनातलं गुज


माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.

(माझी प्रियसी म्हणजेच कविता कशी वाटली कॉमेंट करून कळवा.काही सुधारणा किंवा सल्ला असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.)

15/07/2018

बाप माझा शेतकरी !


पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।

कर्ज आणि दुष्काळ जसे पुजले त्याच्या पाचीला ।
विठू-माउली उभी आहे सदैव त्याच्या पाठीला ।।
शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही या हिंदुस्थानी मातीला ।
छत्रपती उभे ठाकले होते त्याच्या साथीला ।।

वारी करतो भक्ती भावाने असा हा वारकरी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।१।।

वरून राजा प्रसन्न तर हा खुश होणार ।
काबाड कष्टासाठी नेहमीच असे तयार ।।
पांढरं सोन पिकवतो हा सोनार ।
हमी भाव देवच जाणे कोण देणार ।।

फक्त खोटी आश्वासनं देतात सत्ताधारी ।
जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।२।।

सुट्टी नसते ना असतो ओव्हर टाइम ।
काम आणि कामच असते एनिटाईम ।।
कितीही करा प्रगती कितीही येवो तंत्रज्ञान ।
कारखान्यात धान्य बनत नाही असो याचे भान ।।
शेतकऱ्याची काळजी फक्त विरोधी पक्ष्याला ।
पण सत्ता मिळाल्यावर मात्र विसरतात बापाला ।।

बघत आलोय कष्ट त्याचे होतो जेव्हा शाळकरी ।
 जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी ।।३।।

जय जवान जय किसान !

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी 
subscribe करायला विसरू नका आणि share करा तुमच्या मित्रांना .


(तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कळवा आणि जर काही चुका होत असतील तर नक्कीच कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल .)

08/06/2018

फौजी

फौजी,आर्मी,सैनिक हाच तो भारतीय जवान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान.

आपण लढतो जातीसाठी,
तो लढतो मातीसाठी.
आपण लढतो धर्मासाठी,
तो लढतो देशधर्मासाठी.

धर्म,जात,गोत्र,वंश त्याचे आहेत हिंदुस्तान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।१।।

त्याच्या कर्तव्याची आहे मोठी ख्याती,
लढतो बेभान होऊनी फक्त देशासाठी.
दुर्दैवाने आपले अनेक धर्म ,अनेक आहेत जाती,
त्याच्यासाठी देशच धर्म आणि देशच आहेत जाती.

तिन्ही ऋतू त्याच्यासाठी आहेत एक समान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।२।।

राहून-राहून सतावतो प्रश्न मला हा एक,
त्यांनी आपल्यासाठी मरावं,आहोत का आपण त्या लायक?
आठवण काढावी त्यांची १५ ऑगस्ट नंतरही,
देशभक्ती जागीच असावी १५ ऑगस्ट नंतरही.

लपेटून घेतो तिरंग्यात खरंच आहे भाग्यवान,
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।३।।

काळजी घेते बाळाची जशी त्याची माता,
काळजी घेतो हा जिची ती आहे भारतमाता.
आईची काळजी करणारा हाच तो श्रावण बाळ,
नमन करत असेल त्याला आल्यानंतर काळ.

देशाचा आत्मा आहेत भारतीय जवान.
बलिदान देऊन रक्षण करती आपला हिंदुस्तान ।।४।।

जय हिंद !!

माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी 
subscribe करायला विसरू नका आणि share करा तुमच्या मित्रांना .

(तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कळवा आणि जर काही चुका होत असतील तर नक्कीच कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल .)

प्रत्येकाच्या घरी असलेलं दैवत म्हणजे बाबा !

बाबा

होय ज्यांचं नाव आई नंतर जोडलं जातं तेच बाबा।
ज्याच्या विषयी जास्त बोलले-लिहिले जात नाही तेच हे बाबा ।।

ज्यांच्या आगोदर तुमचे कोणी हिरो नसावे असे हे बाबा ।
आयुष्यभर निस्वार्थ तुमच्यासाठी झटणारे हेच ते बाबा ।।

काटकसर आणि त्यागाचे महामेरू फक्त बाबा।
निस्वार्थपणे फक्त तुमच्या भल्याचा विचार करणारे फक्त बाबा ।।

मुलींसाठी प्रेमाचा झरा असते आई पण मुलीवर संकट आल्यावर रुद्र रूप घेणारे फक्त बाबा।
पप्पा,बाबा,वडील ,आणि बाप अशा नावांनी संबोधलं जाणारे बाबा ।।

आई दररोज मुलाची आठवण काढते त्याला फोन करते पण आठवण येऊनही कधी न सांगणारे बाबा।
आई दररोज आठवण काढते पण अचानक नियोजन नसताना भेटायला येतात ते बाबा ।।

साने गुरुजींनाही न दिसलेले बाबा ।
वरून थोडेसे तापट पण आतून मायेचा पाझर असलेले फक्त बाबा।।

वेळेचं महत्व तुम्हाला खूप जण सांगतील  पण
वडिलांचं महत्व तुमच्या त्या मित्राला विचारा ज्याला लहानपणीच सोडून गेलेत त्याचे बाबा।
ते गेल्यानंतर मोठा भाऊ ज्यांची कमी पूर्ण करण्याचा प्रयन्त करतो तेच हे बाबा ।।

माझ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मा आगोदरच
स्वराज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक हेच ते बाबा।
असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे नाही जाता आलं म्हणून देवाने माता निर्माण केली
पण त्या मातेलाही मातृत्व ज्यांच्या मूळे लाभते तेच हे बाबा।।

ज्यांच्या मूळे मी हे सुंदर जग बघू शकलो ते माझे प्रिय बाबा।
ज्यांचे उपकार मरेपर्यंतही फिटणार नाहीत असं माझे बाबा ।।

ज्याचे नाव अभिमानाने सांगावे अशा बाबांना हि माझी छोटीसी भेट ।


03/04/2018

छत्रपती !!

                       
                       छत्रपती


१९ फेब्रुवारी १६३० ला जन्मले माझे छत्रपती।
लाख मेले ज्यांच्यासाठी हो तेच माझे छत्रपती ।।

मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली।
दिल्लीच्या तख्तानेही त्यांची धास्ती घेतली।।
तोरणा घेऊन राजेंनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली।
आदिलशहाला मात्र ही मोहीम चांगलीच भोवली।।

सगळ्या जगाचे राष्ट्रपती फक्त माझे छत्रपती ।
लाख मेले ज्यांच्यासाठी हो तेच माझे छत्रपती।।१।।

शक्ती पेक्ष्या युक्ती श्रेष्ठ हे सांगत अफजल फडला।
शाहीस्ता खानाला तो लालमहालात नडला ।।
औरंग्याच्या मामाला तळ खुपच महागात पडला ।
तोच हा जाणता राजा लाखांचा पोशिंदा ठरला ।।

प्रत्यक्षात असते तर फिके पडले असते माहिष्मती।
लाख मेले ज्यांच्यासाठी हो तेच माझे छत्रपती।।२।।

मावळे होते ज्यांचे बाजी, यसाजी, तान्हाजी ।
आयुष्यभर जीवाशी खेळले छत्रपती शिवाजी।।
वेडात मराठी वीर दौडले सात ।
धन्यासाठी लढले ते एकसाथ ।।

डोक्यावर घेतले प्रजेने असे माझे प्रजापती ।
लाख मेले ज्यांच्यासाठी हो तेच माझे छत्रपती।।३।।

शिवराय नावानेच त्यांचा जीवनकाळ सांगितला।
शिवनेरी वर जन्म तर रायगडावर विसावा घेतला ।।
आयुष्यभर हे आहेत कर्मयोगी ।
आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत श्रीमंत योगी।।

ज्यांच्या नंतर लाभले शंभो छत्रपती ।
लाख मेले ज्यांच्यासाठी हो तेच माझे छत्रपती ।।४।।

        ।। जय जिजाऊ जय शिवराय ।।🚩


माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी 
subscribe करायला विसरू नका आणि share करा तुमच्या मित्रांना .

(तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कळवा आणि जर काही चुका होत असतील तर नक्कीच कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर एखादा नवीन विषय सुचवावा वाटला तर नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल .)

                                            योगेश अमृते🎓

20/02/2018

गैरसमज !!

गैरसमज !!

काय असतो हो गैरसमज ?🤔

जो झाल्या नंतर नातं संपतं तो गैरसमज .💔
लक्ष्मणाला भरताविषयी झालेला हाच तो गैरसमज.

आपण स्वतः माणूस पारखून ठेवतो तो विश्वास
आणि दुसरा आपल्याला त्याच्या वयक्तिक स्वार्थासाठी करून देतो तो गैरसमज .

बाहुबली सिनेमात अमरेंद्र बाहुबलीच्या मृत्यूचं कारण म्हणजे गैरसमज.


कधी-कधी  अती विश्वासामूळे ( because of Overconfidence) होणारा रोग 🏥 म्हणजे गैरसमज .


एखाद्याच्या बोलण्या-वागण्याचा आपण आपल्या चुकीच्या दृष्टीकोणामुळे काढलेला निष्कर्ष म्हणजेच गैरसमज .

जो चुकीपेक्षाही घातक तो म्हणजे गैरसमज ,
कारण ज्यामुळे काच तुटते ती चुकी आणि ज्यामुळे नातं तूटतं तो गैरसमज.

जो मॅगी सारखा लगेच होतो तोच हा गैरसमज ,
दुदैवाने आपल्याला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दलही होतो तो गैरसमज .


मला मी कवी असल्यासारखं वाटणं हाच तो माझा गैरसमज,😝
पण मी कविता करणं सोडणार नाही हा मात्र समज.

तुम्ही कविता वाचून मला नवीन कवितेसाठी विषय सुचवाल हा सुद्धा माझा एक गोड गैरसमजच🤐

( तुम्हाला माझी कविता कशी वाटली 🤔 नक्की काळवा आणि जर काही सुधारणाअसेल तर नक्कीच सांगा म्हणजे मलापुढे अजून काहीतरी नवीन लिहायला✒ वाव मिळेल आणि तुमचे काही नवीन विषय असतील तर नक्कीच सुचवा मी त्यावर कविता करण्याचा नक्की प्रयत्न करेल !!

- योगेश अमृते ...🎓)

30/01/2018

मनातलं गुज !

👬 एका हरामी मित्रासाठी लिहिलेलं मनातलं गुज:
 By :Yogi Amrute.


 बोलता-बोलता पोरगं मनाला लागेल असं बोलून जाईल पण काळजी करू नका, काव्हर-बावर होण्यासारखा काही नाही, पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही .


 मुलीशी(GF)बोलता-बोलता तो तुम्हाला विसरून जाईल, तुम्ही पण सोबत आहात याचं त्याला भान राहणार नाही,
तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही, पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही.

 तुमचा फोन उचलेल याची खात्री नाही ,
पण GF ला फोन करणार नाही असं कधी होणार नाही , त्याचा तुम्हाला समोरून फोन येईल हे मात्र सांगता येत नाही, तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही,पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही.


 तुम्ही चूक नसताना माफी मागाल पण तो चूक असताना माफी मागेल हे मात्र सांगता येणार नाही,
तुम्ही चूक नसताना माफी मागायची ठरवली तरी तो फोन उचलेलच हेही सांगता येणार नाही ,
तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही, पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही.


हि कविता वाचून त्याला कळेल सगळं पण तरी तो हरामी फोन करेलच हेही सांगता येणार नाही ,
असं म्हणतात कि संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र, पण तो संकटातही मित्राला आठवेलच हे काही सांगता येणार नाही,
तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही , पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही.


 त्याच्या आयुष्यात तुमचं महत्व कमी होत जाईल,
तुमच्याशी न बोलता ही तो जगत राहील,
तुमचं त्याच्याशी न बोलता काय होईल हो मात्र सांगता येणार नाही,
तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही, पोरगा थोडा बदललाय बाकी काही नाही.

 देवाला एकाच मागेल की मला कधीच माझ्या मित्रांचा विसर पडणार नाही ,
कारण GF असली-नसली तरी मी मात्र माझ्या मित्रांशीवाय जगू शकणात नाही.

Dedicated to all the harami who forgets their friends for the Girlfriend.

कधी कविता केली नाही पण एका हरामीसाठी एवढे शब्द बाहेर आलेत कि मलाही कळलं नाही,
तरी काळजी करू नका काव्हर-बावर होण्यासारखं काही नाही , त्या हारामीला मी विसरू शकत नाही बाकी काही नाही.


 ( तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की काळवा आणि जर काही सुधारणा असेल तर नक्कीच सांगा म्हणजे मला पुढे अजून काहीतरी नवीन लिहायला वाव मिळेल.)

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...