23/12/2019

स्वभाव


स्व आणि भाव जसे दोन शब्द
तशाच दोन गोष्टींचा होतो इथे मेळ
मनातला भाव आपल्या वागण्यात
घेऊन येणारा हा प्रकृतीचा खेळ

माणूस चांगला की वाईट
याची पावती सुद्धा हाच देतो
चंद्रा प्रमाणे यात सतत बदल होतो
जेव्हा येणाऱ्या अनुभवांचा यावर मारा होतो

डोळ्यांतील भावना प्रमाणे
स्वभाव सुध्दा लपत नाही
जसा पेटलेल्या धूनी तून
धुवा लपवता येत नाही

हा चांगला नसेल तर सौंदर्य सुध्दा फिक पडतं
मग सुंदर असूनही माणसाचं वागणं कायम नडतं
स्वभाव आवडला की व्यक्ती ही आवडतो
हाच स्वभाव एक चांगलं व्यक्तिमत्व घडवतो

संकटात सिंहाला मदत कोणी करत नाही
कारण नडतो तो स्वभाव ताकत इथे नडत नाही
सुंदर व्यक्ती चांगल्या स्वभावाचा असेलच असं नाही
पण चांगल्या स्वभावाचा व्यक्ती कायम सुंदर असतो


एक विनंती : comment केल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा.


माझ्या बाकीच्या कविता वाचण्यासाठी भेट द्या yogiamrute.blogspot.com.

03/11/2019

जगाचा पोशिंदा !

कहर मांडलाय पावसानं
अजून किती हिम्मत ठेवावी माणसानं
कोंब वर काढलेत कणीसानं
कापूस सुद्धा उगलाय या पावसानं

बस कर आता वरून देवा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।१।।

येरे येरे पावसा आता कसं म्हणावं
अश्या परिस्तितीत कोणी कसं हसावं
अतिथी देव भव: बोलावणारे आम्ही,
तुला तरी जा कसं म्हणावं

तुच व्यथा आता समज देवा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।२।।

आश्वासनांचा पाऊस अगोदरच खूप झालाय
त्यात तू अजून तुझा कहर मांडलाय
नेते मंडळीसाठी हा तर एक खेळच झालाय
आमच्या भावनांचा मात्र त्यांनी बाजारच मांडलाय

तू तरी पक्का कर आता दावा ।
परत न येण्याचा कर तू दावा ।।३।।

तू फक्त मला साथ दे
संकटांना मी घाबरत नाही
आणि तुझी साथ असेल तर,
मला गरज कुणाची नाही
आत्महत्या मी करणार नाही
जगाचा पोशिंदा आहे एवढ्या लवकर हात टेकणार नाही

पावसाळ्यात मी तुझी वाट पाहिल वादा करतो देवा ।
पण तू त्या आधी येणार नाही असा कर तू दावा ।।४।।

09/09/2019

आठवणीतली ती 💛

काय म्हणू आणि कसं सांगू तुला
वेडे कुठे-कुठे नाही शोधलं तुला

दिवसा उघड्या डोळ्यांनी स्वप्न तुझे बघायचो
आपण परत एक झालो असं मनाला सांगायचो

येणारा प्रत्येक अनोळखी call तुझी आठवण द्यायचा
तूच तर call नाही ना केला असा भास व्हायचा

मनाच्या कोपऱ्यात रोज तुला पूजत होतो
देवालाही हेवा वाटेल एवढं तुला मागत होतो

बुद्धी कधी-कधी बंड करून उठायची
विचारायची मला खरच का रे ती तुझ्यावर प्रेम करायची ?

तेव्हा मन तुझ्या आठवणी सांगायचं
तुझं माझ्यावर प्रेम होतं हे बुद्धीला पटवायचं

मनाच्या साथीला मग डोळे पुढे यायचे
मी तिचं प्रेम बघितलंय छातीठोकपणे सांगायचे

तुझं नाव ऐकलं तरी धडधड वाढायची
मग हळूच तुझी आठवण डोकं वर काढायची

कुठे असशील कशी असशील प्रश्न मला पडायचे
तुझ्या आठवणीत हृदय मात्र आश्रू विना रडायचे




कृपया कुणीही अकलीचे तारे तोडू नये तुमच्या कृपेने मी अजून पण single आहे ।

बाकी कविता कशी वाटली नक्की सांगा !

Do check my other poems only on
yogiamrute.blogspot.com

11/07/2019

विठू माऊली


तुझ्या भेटीची आस या पावली ।
माय-बाप माझी विठू माऊली  ।।

पुंडलिका साठी उभा विटेवरी
हात दोन्ही आहेत कटेवरी
भक्तांचा पाठीराखा सावळा हरी
दर्शनाचा अभिलाषी विठूचा वारकरी

नामघोष याचा पावलो-पावली  ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।१।।

चंद्रभागे तीरी याची नगरी
नाथ हा जिचा ती पंढरी
भक्तांच्या जीवनाला तो उद्धारी
तुळशी वृंदावन वारकऱ्यांच्या दारी

वारकऱ्यांच्या डोई प्रेमाची सावली  ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।२।।

चंद्रभागेला भेटायला येते इंद्रायणी
विठू माऊलीच फक्त ध्यानी आणि मणी
डोंबा घरी हरी भरतो पाणी
माउली माउली हर एकाच्या वाणी

वसे हृदयी न आवडे त्यास राऊळी ।
माय-बाप माझी विठू माऊली ।।३।।


21/06/2019

यश-अपयश

एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक आपलीशी तर नकोशी वाटते दुसरी
आकाश दाखवते पहिली
तर जमीन दाखवते, ती बाजू दुसरी

यश-अपयश दोन्ही गरजेचे,
हेच सांगतात कोण आपले आणि कोण परके.
अपयशाच्या अंधारात सोडणारे
यश रुपी उजेडात मात्र सगळ्यांच्या पुढचे

अपयश आल्यानंतर
यशाची किंमत कळते
तेव्हा उभा राहतो एक अभेद्य माणूस
आणि मग यश सुद्धा त्याच्याकडे वळते

कीव येते त्यांची जे एक बाजू बघून
दुसरी बघण्या आधीच जातात निघून
नाण्याच्या दोन्ही बाजू यशात बदलतात जेव्हा,
दुसरी काय नाही करायचं शिकवते तेव्हा.

                                          - योगेश अमृते


Failure is a way of the destination called success.

14/05/2019

शंभो छत्रपती

सिंहाच्या पोटी छावा जन्मला
किल्ले पुरंदराचा कैलास झाला
सूर्यनारायण सुद्धा फिका पडला
जेव्हा शंभो सूर्याचा जन्म झाला

पुरंदर रुपी कैलासाचे अधिपती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।१।।

नियतीने त्यांना बालपणीच पोरक केले
पित्यासाठी अल्पवयात राजकारण केले
आग्ऱ्यात जाऊन औरंग्याला नडले
आणि चतुराईने तुरी देऊन निसटले

रयतेची काळजी करणारा प्रजापती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती  ।।२।।

कारस्तानाचे विष गळी उतरवले
माफी रुपी चंद्राला माथी मिरवले
काव्यरचना करून मन जिंकले
मित्रत्वाचे जिवंत उदाहरण दिले

धर्मवीर धर्मशील शौर्यपती।     
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।३।।

नऊ वर्ष औरंगजेबाला रडवले
आम्हास कसं मरावं हे दाखवले
इथे लाखो शंभो परत जन्मले
औरंग्याची समाधी बांधूनच थांबले 

मृत्युंजय अजिंक्य भूतपती। 
शंभो शंभो शंभो छत्रपती ।।४।।

12/04/2019

निवडणुकीचे वारे

प्रलोभनांचा पाऊस आता करील वर्षाव
नोटांमध्ये होईल आता इमानाचा भाव
भले-भले त्यांच्या बळी पडतील राव
स्वाभिमानाचा सुद्धा हे करतील लिलाव

भर उन्हाळयात सुरू झाले हे बिनमौसमी वारे   ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।१।।

खुर्चीचा खेळ आता मात्र रंगेल
उमेदवारी साठी ते पक्षही बदलेल
आश्वासनांचा आता इतिहास घडेल
मतदारच ठरवेल आता पुढे काय घडेल

मतदारांसाठी खरच आहेत, ही संधी रुपी दारे     ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।२।।

मंदिर-मशीद आता पटावर लागतील
एवढे दिवस झोपलेले आता मात्र जागतील
जातीवादाचा साप आता हे सोडतील
दुर्दैवाने बरेच त्याला बळी सुद्धा पडतील

विचारपूर्वक करा मतदान मग बदलेल उद्या सारे    ।
मतांचा पाऊस पाडण्यासाठीे निवडणुकीचे वारे ।।३।।

Be the proud voter of India !

16/03/2019

दृष्टीकोन (Attitude)


यश रुपी गरुडाचे पंख म्हणजे दृष्टीकोन
भविष्य बदलवणारा परिवर्तक म्हणजे दृष्टीकोन
अडचणीत संधी शोधणारा गोताखोर म्हणजे दृष्टीकोन
तर दर दिवशी नावीन्य शोधणारा शोधक म्हणजे दृष्टीकोन

धावणाऱ्या रेल्वेचा चंद्रही पाठलाग करतो  ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो    ।।

कधी तो ढगांच्या आकृत्यात चित्र शोधतो
तर कधी अंथरुणात पडलेल्या पीडितांची आस होतो
सकारात्मकता आणि नकारात्मकता सुध्दा ठरवतो
तर कधी उडणाऱ्या पतंगात आपली धडपड शोधतो

समोरच्या खिडकीतही चंद्राचा तुकडा दिसतो ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो    ।।

हाच दृष्टीकोन कधी कवितेच्या प्रेमात पडतो
आणि शब्दांचे अलंकारिक रूप शोधतो
माझ्या मनातलं गुज मलाच सांगतो
आणि कविता बनून तुमच्या समोर येतो
दुनिया रुपी सिनेमा सुद्धा बदलतो
जेव्हा आपण दृष्टीकोनाच्या खिडकीतून पाहतो 

सकाळी दिसणारा सूर्य दुपारी नको-नको वाटतो    ।
जेव्हा आपण दृष्टीकोनाची खिडकीच बदलून पाहतो    ।।



माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe by e-mail आणि follow करायला विसरू नका.

27/01/2019

मुलगी


ती म्हणजे जसे उमळलेलं फुल ।
नका लादू तिच्यावर चूल आणि मूल  ।।
जन्म तिचा होताच ती जबाबदारी वाटते ।
मात्र तिच्या जबाबदारपणाकडे लक्ष्य कुणाचे नसते ।।

ताराबाईंच्या रूपात हीच ती रणरागिणी  ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी ।। १ ।।

कधी ती मनू ची मणिकर्णिका होते  ।
आणि पाठीला दामोदरांना घेऊन लढते ।।
तर कधी जिजाऊ ची राजमाता होते ।
आणि छत्रपतींना घडवून जाते ।।

तलवारीपेक्षा धारदार असते ती लेखणी    ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी ।।२।।

वडिलांचा आधार असते मुलगी  ।
बहिन तर कधी आई असते मुलगी ।।
घरची लक्ष्मी म्हणजे मुलगी ।
तर कधी सून म्हणून येते मुलगी ।।
मुलगा जर वंशाचा दिवा असेल ।
तर आयुष्यभर झिजणारी समई म्हणजे मुलगी ।।

एक नाही तर दोन घरांची करते ती बांधणी ।
बाळासाठी बुरुज उतरून येते ती हिरकणी  ।।३।।

• Save girl child ! 

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...