03/02/2024

बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे,

घरात बाळ जन्माला येते

घरातल्यांचा आनंद द्विगुणित 

करणारं बालपण घरात येते


घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा

बालपण भारी देवा ...


बालपण जणू कुतूहलाचा भंडार असते

कुठलीही गोष्ट फुटेल, तुटेल किंवा बिघडेल,

ह्या भीती पलीकडची ती जिज्ञासा असते


बाळाचा सहवास वाटतो हवा हवा

बालपण भारी देवा ...


मुलं ही देवा घरची फुलं म्हणत 

जणू असतं ते देवपण

कारण देव सुद्धा अवतार घेऊन 

अनुभवतो हो बालपण


देवही बाळ होऊन करतो आई ची सेवा

बालपण भारी देवा ... 


बालपण जणू पहिल्या पावसात

भिजलेल्या सुवासित माती सारखं असतं,

आयुष्य रुपी उन्हात ते माणसाच्या

आठवणीत कायम सोबत असतं


आयुष्भर पुरेल असा आठवणींचा ठेवा

बालपण भारी देवा ...


खोडकर, नटखट आणि बेधुंद असतं बालपण

कावे, कारस्थानाच्या पलीकडचं असतं बालपण 

बिनधास्त चुका करायचं विद्यापीठ म्हणजे बालपण.

तर संसारिक जबाबदाऱ्या आणि बंधनांच्या पलीकडचं बालपण


भातुकलीच्या खेळामधून घ्यावा सांसारिक ठेवा

बालपण भारी देवा ...



- योगेश अमृते 

22/06/2023

बदलते देखा ...

 बचपन से रखा भरोसा उसे बदलते देखा ।

मैंने वक्त के साथ सबकुछ बदलते देखा ।।


ना कोई राजा, ना रंक, हर वक्त रहा

वक्त के साथ सबकुछ बदलता रहा 

किसी का अच्छा था समय, तो किसी का बुरा रहा

पर समय अच्छा हो या बुरा, हमेशा बदलता रहा 


जीवन मैं इंसान को अलग अलग किरदार निभाते देखा ।

मैंने वक्त के साथ सबकुछ बदलते देखा ।।


समय के साथ हर जख्म भरता रहा

जीवन मैं आई कठिनाइयों से इंसान लड़ता रहा

ठोकरे खाकर वो हर बार सीखता गया

सीखे हुए हर पाठ से वो जीवन मैं बढ़ता गया


मैंने रिश्ते नाते सब बदलते देखा ।

मैंने वक्त के साथ सबकुछ बदलते देखा ।।


साथ बदला, साथीदार बदला

जिंदगी जीने का अंदाज बदला

चीजे बदली, वक्त बदला

जिंदगी को देखने का नजरिया बदला


कसमें, वादे, प्यार, वफा सब बदलते देखा ।

मैंने वक्त के साथ सबकुछ बदलते देखा ।।


वक्त के साथ लोगो के चेहरे बदले

जिंदगी के साथ हमने कई मोड़ बदले

हर मोड़ पर लोगों की अहमियत बदली

इंसान बदला इंसानियत भी बदली


हर राह, हर मंजिल पर जिंदगी को बदलते देखा ।

मैंने वक्त के साथ सबकुछ बदलते देखा ।।


28/02/2023

मैत्री

 काय असते हो मैत्री ??


मैत्री म्हणजे जणू जीवन रुपी

उन्हात मिळालेली सावली

जीवनातल्या प्रत्येक संकटात 

मैत्रीच आधी धावली


दररोज मिळालेला मानसिक आधार असते मैत्री

खचल्यानंतर मिळालेली खंबीर साथ म्हणजे मैत्री


चुकल्या नंतर हक्कानं कान धरते

पडल्यानंतर मात्र प्रेमाने सावरते

चूक अचूक नेमकं ओळखून

मित्राचा जणू सल्लागार बनते


न बोलता मन ओळखणारी मनकवडी असते मैत्री

सुदामाचे पोहे ही आवडीने खाणारी निरहंकार असते मैत्री


मैत्री आरश्या सारखी असते

निर्मळ निस्वार्थ ती पारदर्शक असते

दुःख रुपी कोरोनावर जणू

ती आनंदाचा डोस असते


वेगवेगळ्या कुरापतीत केलेली साथ म्हणजे मैत्री

तर कमीने पणाची केलेली हद्द म्हणजे मैत्री


मित्र-मैत्रीण जणू मैत्री रूपी 

नावेचे नावाडी असतात

जीवन रूपी समुद्रात

ते नाव वलवतच असतात


विचार आणि गुण-अवगुनांचा झालेला संगम म्हणजे मैत्री

जात पात आणि धर्माच्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री


मरेपर्यंत मिळालेली साथ मैत्री

एकटेपणात मारलेली हाक मैत्री

एकमेकांची काढलेली लाज मैत्री

तर कितीही व्यस्त असलो तरी 

बोलायचा घातलेला घाट मैत्री


जीवन रुपी पक्वांनाला चव आणणारं मीठ म्हणजे मैत्री

तर निसंकोच मन मोकळं करायचं ठिकाण म्हणजे मैत्री


15/04/2022

सफर में थे हम सफर के हो गए ।

घर से निकले थे एक मंजिल की तलाश में,
मंजिल का पता नही पर मुसाफिर बन गए
अब ना घर के रहे ना बाहर के हो सके
सफर में थे हम सफर के हो गए

सफर में कोई अच्छा
तो कोई बुरा मिला
अच्छी और बुराई का मानो
सिलसिला मिला

इन्हीं सिलसिलो से सीखते गए ।
सफर में थे हम सफर के हो गए ।।

सफर में सफलता देखी
सफर में असफलता भी देखी
असफलता के बाद की
मयूसियत भी देखी

हम मयूसियत को भी निगल गए ।
सफर में थे हम सफर के हो गए ।।

सफर में कई मुसाफिर मिले
हर किसी ने खूब सीखा दिया हमे
कोई साथ रह गया सफर में
तो कोई छोड़ गया हमे

किसी ने रास्ते बदले तो कई खुद बदल गए ।
सफर में थे हम सफर के हो गए ।।

जब सफर में निकले थे
तब कुछ नही था साथ हमारे
अब दुख दर्द और आनंद के
साथ जख्म है हमारे

हम जख्मों पर मरहम लगाते गए ।
सफर में थे हम सफर के हो गए ।।

मंजिल का शौक नहीं
सफर के शौकीन है हम
मंजिल आने से पहले ही
सफर में ही जी लेंगे हम

मंजिल का छोड़ हम सफर में जीते गए ।
सफर में थे हम सफर के हो गए ।।


16/12/2021

कोशिश में हूं

जिंदगी की भाग दौड़ में

खुश रहने की कोशिश में हूं

कल से कुछ अच्छा करने की

मैं आज भी कोशिश में हूं


मैं कल भी कोशिश में था ।

मैं आज भी कोशिश में हूं ।।


हर दिन और गुजरते रात में

मैं जिनें की कोशिश में हूं

जिंदगी ने दिए हर जख्म को

भरने की कोशिश में हूं


मैं कल भी कोशिश में था ।

मैं आज भी कोशिश में हूं ।।


कोशिश ना करने के 

मलाल से मैं कोसो दूर हूं

इसीलिए हर बार कोशिश करने की 

मैं आज भी कोशिश में हूं


मैं कल भी कोशिश में था ।

मैं आज भी कोशिश में हूं ।।


सब की उम्मीदों पे खरा

उतरने की कोशिश में हूं

उम्मीद पे दुनिया को कायम

करने की कोशिश में हूंं


मैं कल भी कोशिश में था ।

मैं आज भी कोशिश में हूं ।।



YouTube Channel Link👇👇👇


https://youtube.com/channel/UClk2_kZj7UYilmG1Fq8leIQ


07/10/2021

मुलगा

मुलगा झाला आनंद झाला
वंशाचा दिवा झाला
नवस केला होता देवाला
तो आता पूर्ण झाला

घरापासून दूर सासरी गेल्या सारखं राहणं
मन लागेल लागेल तरी अभ्यास मात्र करणं
हे सगळे कारणं तुला देता येणार नाही
कारण नापास होणे हा पर्यायच तुझ्याकडे नाही

हळू हळू मोठा होत
शिक्षण पूर्ण होत आलं
नोकरी मात्र लागली नाही
अरे हे असं कसं झालं

शेवटी सुदैवाने नोकरी लागली
प्रयत्नांची पराकाष्ठा कामी आता लागली
तुला कोण मुलगी देईल ? ची थट्टा बंद होऊन
किती कमवतो ? ची चेष्टा मागे लागली

अपयश येवो नाहीतर प्रेमभंग होवो
तुला मात्र रडता येणार नाही
कारण लहानपणापासून ऐकलंय
म्हणे मर्दला ला दर्द होत नाही

ह्या सगळ्या नादात आम्हाला
कधी व्यक्तच होता येत नाही
इच्छा असून सुद्धा वडिलांना मिठी
मारायची हिम्मत आमची कधीच होत नाही

घर बांधण्यासाठी आम्ही
घर सोडून जातो
राजकुमारासारखा राहणारा तो
बाहेर तडजोड करून राहतो

जबाबदार्यांची ओझी
आता जाणवायला लागतात
सगळ्यांच्या अपेक्षांच्या मध्ये
तुझ्या इच्छा मात्र मार्गी लागतात

लग्न झाल्यानंतर ती आयुष्यात येते
आणि जबाबदार्यांमध्ये नकळतपणे वाढ होते
कालपर्यंत लहान वाटणाऱ्या मुलाचा
आता घरचा कर्ता पुरुष होते

जबाबदारी रुपी वंशाचा दिवा असतो मुलगा
आई वडिलांचा आधार असतो मुलगा
अपेक्षापूर्ती कल्पवृक्ष म्हणजे मुलगा
तर सगळे मुलं सारखेच असतात चा सोशिक म्हणजे मुलगा


Dedicated to all the boys !


18/04/2021

आम्ही फक्त राजकारणच केलं !

 


संकट आलंय खूप मोठं

लढायला तयार रहायचंय 

ते सगळं राहिलं बाजूला

आम्हाला तर राजकारण करायचंय 


पहिल्या पासून आम्ही हेच केलं

आम्ही फक्त राजकारणच केलं 


मंदिर-मशीद, जात-पात

आम्ही सगळं यामध्ये आणलं

विकासाचं सत्र मात्र मध्येच

कुठेतरी थांबलं


सत्तेसाठी नेत्याला बाप आम्ही केलं 

पहिल्यापासून आम्ही फक्त राजकारणच केलं 


देशात महामारी अथवा महापूर येवो 

दुष्काळ पडो नाहीतर अतिवृष्टी होवो

देशाचं जे व्हायचं ते होवो 

पण पुढच्या वेळी सत्तेत मात्र आमचाच पक्ष येवो 


देशावर आलेल्या संकटांच आम्ही एकच केलं

आम्ही फक्त राजकारणच केलं 


पक्ष येतील पक्ष जातील 

पण देश कायम राहणार आहे

देवच जाणे आम्हाला पक्षा पेक्षा

देश कधी महत्त्वाचा वाटणार आहे


मुद्दा कुठलाही असो सोडवण्या ऐवजी आम्ही एकच केलं

आम्ही फक्त राजकारणच केलं 


तुमच्या आरोप प्रत्यारोपाच्या 

नादात, हाल जनतेचे झाले

विकासकामे तर राहिलेच बाजूला

तुमच्या पर्यंत आवाज पोचण्या आधीच उद्ध्वस्त कुटुंब झाले


देश सेवा करू म्हणत आम्ही एकच केलं

आम्ही फक्त राजकारणच केलं


Dedicated to all the political parties of India.




05/01/2021

ये भी ठीक है ।


कर हौसला बुलंद तुझे ।

बुराइयों से लड़ना है ।।

बाहर की तो ठीक है ।

अंतर्मन से भी लड़ना है ।।


जिंदगी के सताए हम ।

पर पीछे नहीं हटना है ।।

यूंही तो नहीं मिलेगी मंज़िल ।

संघर्ष तुझे करना है ।।


मिटाने आयेगी दुनिया तुझे ।

पर डटे तुझे रहना है ।।

तकलीफ हो तुझे तो ।

थोड़ा सह भी लेना है ।।


हसते हुए चेहरे, ।

नकाब के पीछे रोए है ।।

रोते हुए कुछ तो ।

खाली पेट सोए है ।।


इस भाग दौड़ भरी जिंदगी मैं ।

कहां कौन ठीक है   ।।

कोई पूछे तो बस कह देना ।

कि ये भी ठीक है ।।


बालपण भारी देवा ...

कळीचं फुलं होते तसे, घरात बाळ जन्माला येते घरातल्यांचा आनंद द्विगुणित  करणारं बालपण घरात येते घरातल्या प्रत्येकाला वाटतो बाळाचा हेवा बालपण भ...